श्री संताजी जगनाडे महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त श्री संताजी जगनाडे महाराज तेली समाज बहुउद्देशीय युवक मंडळातर्फे पालखी सोहळा व मिरवणूक १३ जानेवारी २०१३ रोजी सकाळी ८ वाजता स्वामी समर्थ मंदिर, कांचन नगर येथून सुरुवात होऊन चौघुले प्लॉट, शनीमंदिर, घाणेकर चौक, टॉवर चौक, कॉंग्रेस भवन, दाणा बाजार, सुभाष चौक, राजकमल टॉकीज, बेंडाळे चौक, जोशी पेठ, पांझरापोळ टाकी, कालंकामाता मंदिराशेजारी, तुळसाई नगर, श्री संताजी जगनाडे महाराज उद्यान येथे सांगता होईल.
तसेच पुण्यतिथी निमित्त १३ जानेवारी रोजी सकाळी ८ वाजेपासून विविध कार्यक्रमांना सुरुवात होईल. त्यात मिरवणुकीत उत्कृष्ट व आकर्षक सजावटीसह कलशधारी महिला व मुली यांचे आकर्षक स्पर्धा, ज्यांचे कलश उत्कृष्ट व आकर्षक असतील त्या महिला व मुलींना प्रथम बक्षीस ५०१/-, द्वितीय ३५१/- व तृतीय २५१/- आणि ८ ते १५ वर्षाखालील मुला-मुलींकरिता विविध संतांची वेशभुषा स्पर्धा, ज्या मुला-मुलींची वेशभुषा जास्तीत जास्त उत्कृष्ट व आकर्षक असतील त्यांना प्रथम बक्षीस ३५१/-, द्वितीय २५१ व तृतीय १५१/- असेल. वेशभुषा फक्त विविध संतांची असावी.
तरी सर्व समाजबांधवांनी सहकुटूंब, सहपरिवारासह मोठ्या संख्येने मिरवणुकीत हजर राहून महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन युवक मंडळाचे अध्यक्ष दत्तात्रय चौधरी यांनी पत्रकाद्वारे केले आहे.
sant jagnade maharaj, punyatithi,teli samaj jalgaon