CR:Anil Chatur – Pathardi, Sagar Mehetre – Pune:- अहमदनगर येथील स्वस्तिक चैकातील तुषार गार्डन मध्ये जिल्हा तेली समाज महासभा व तेली समाज सेवा मंडळ, अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमाने ६ वे राज्यस्तरीय ‘‘तेली समाज चिंतन शिबीर’’ राज्यातून वेगवेगळया भागातून आलेल्या तेली समाज बांधवांच्या उपस्थितीत आनंदात पार पडले.
या चिंतन शिबीराची सुरुवात दिप प्रज्ज्वलनाने झाली. दिप प्रज्ज्वलन गजानन (नाना) शेलार, जनार्दन मिटकर, प्रा.वसंतराव कर्डिले, डॉ.भूशण कर्डिले, जिल्हाध्यक्ष हरिभाउ डोळसे, पोपटराव पिंपळे आदींनी केले. यानंतर तैलिक महासभेच्या नियमाप्रमाणे सर्वांनी राष्ट्रगित पार पाडले व चिंतन शिबीरास सुरुवात झाली.गेल्या ऑक्टोबर महिन्या महिन्याच्या अखेरीस औरंगाबाद येथे एक दिवसीय राज्यस्तरीय तेली समाज चिंतन शिबीर घेण्यात आले होते. या शिबीरात मराठवाडा त्याचप्रमाणे महाराष्ट्राच्या अनेक जिल्हयातील समाज बांधवांनी भाग घेतला होता. शिक्षणाचे महत्व, स्पर्धा परिक्षांच्या पूर्व तयारीची आवष्यकता, उद्योजकता विकास, त्याचप्रमाणे व्यवसायाच्या संदर्भात चर्चा या शिबीरात झाली होती या सर्व बाबींचा आढावा घेउन या शिबीरातील विषय १. तेली
समाजासोबत खांद्याला खांदा लाउन लढण्याकरिता साहु समाजाला ओ.बी.सी. च्या सवलती मिळाव्यात, २. आरक्षणामध्ये प्रमोषन हया कायदयात ओ.बी.सी. चा समावेष करण्यात यावा. , ३.तेली समाजाचे सर्व मासिक, पाक्षीक, साप्ताहीक, अर्धसाप्ताहीक, दैनिक निघण्याकरीता कोणते कार्यक्रम तथा उपक्रम राबवावेत? या विषयांस सुरुवात झाली. यावेळी उपस्थित समाज बांधवांपैकी काही समाज बांधवांनी आपली मते व्यक्त केली.जे.यु.मिटकर यांनी समाज जागृती करण्यासाठी कृती महत्वाची आहे. आपला समाज हा विखुरलेला आहे. त्यातल्या त्यात आपल्या पोटजातींचा उल्लेख करत फक्त तेली हीच नोंद असायला पाहिजे त्यामध्ये लिंगायत, तिळवण, एक बैली, दोन बैली, साहु, गांधली, घांची वगैरे अशा पोटजातींचा उल्लेख करु नये तेली-181 फक्त एवढेच. असे केल्याने ओ.बी.सी. चे आरक्षण मिळेल. शासनाच्या सवलती घेता येतील. खानेसुमारी करुन घेण्याची गरज असल्याचे सांगितले डॉ. महाले यांनी आपल्या भाषणात सांगितले की भारतात 774 पोटजाती आहेत. तेली तितुका मिळवावा…. आधी होता तेली मग भगवंताने दुनिया केली.
गजानन शेलार नाना, प्रा.डॉ.भुशण कर्डिले, डॉ. महाले, विजय शिंदे, बागुल सर, प्रकाशशेठ शिंदे आदींनी आपली मार्गदर्शनपर भाषणे केली. चिंतन षिबीर पार पाडण्यासाठी विजय काळे, प्रा.डॉ. भुशण कर्डिले, विलास काळे यांनी विशेष परिश्रम घेतले.
अशाप्रकारे ६ वे राज्यस्तरीय तेली समाज चिंतन शिबीर यशस्वीरित्या पार पडले. या चिंतन शिबीराचे सुत्र संचालन विलास काळे तर आभार हरिभाउ डोळसे यांनी मानले.
chintan shibir, teli samaj ahamadnagar