सिंधुदुर्ग जिल्हा तेली समाज उन्नती मंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी सकाळी येथील वृंदावन मंगल कार्यालय येथे घेण्यात आली. या बैठकीत नुतन जिल्हा कार्यकारीणीची निवड करण्यात आली असून जिल्हाध्यक्षपदी एकनाथ केशव तेली (कुणकेश्वर – देवगड), तर सचिवपदी प्रशांत एकनाथ वाडेकर (देवगड) यांची एकमताने निवड करण्यात आली.
जिल्हा कार्यकारीणीची वार्षिक सर्वसाधारण सभा जिल्हाध्यक्ष आबा तेली यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या सभेत २०११-१२ व २०१२-१३ चा वार्षिक अहवाल सादर करण्यात आला. तसेच ऑडीट रिपोर्टमधील सूचनांचेही वाचन करण्यात आले. यावेळी उपस्थित सभासदांनी मार्गदर्शक सूचना करून अहवालास मंजुरी दिली. जिल्हा कार्यकारीणीची मुदत संपल्यानंतर नुतन कार्यकारीणी निवडण्यात आली. यामधे अध्यक्षपदी एकनाथ तेली, तर सचिवपदी प्रशांत वाडेकर यांच्यासह उपाध्यक्षपदी नंदकुमार राजाराम आरोलकर (कणकवली), रवींद्र शंकर कांदळकर (कसाल), कोषाध्यक्षपदी संजय तुकाराम कवठकर (मालवण-कोळंब), सहसचिवपदी राजेंद्र हिंदळेकर (देवगड-जामसंडे) यांची निवड करण्यात आली. तसेच कार्यकारिणी सदस्य म्हणून सुभाष हरि शेटये (देवगड), नारायण मोतिराम हिंदळेकर (देवगड), परशुराम झगडे (सावडाव), चंद्रकांत तेली (कलमठ), शैलेश डिबोलकर (कणकवली), सौ. पूजा सूर्यकांत तेली (कसाल), गणेश तुकाराम तेली (कुडाळ), नीलेश ज्ञानेश्वर कामतेकर (कसाल), अशोक अनंत पेडणेकर (बेंगुर्ला), प्रकाश सखाराम दाभोळकर (बेंगुर्ला), सौ. स्मिता विठ्ठल सोनवणे (सावंतवाडी-तळवडे), विष्णू महादेव मठकर (रामगड-मालवण) यांची निवड करण्यात आली. या बैठकीला मोठ्या संख्येने तेली समाज बांधव उपस्थित होते. आभार नंदकुमार आरोलकर यांनी मानले.
sindhudurg jilha teli samaj unnati mandal