कोथरूड येथील श्री संताजी प्रतिष्ठानच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव व तिळगूळ समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी दहावी-बारावीतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा प्रशस्तिपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. तसेच योगतज्ञ नंदकुमार अंबिके यांनी योगाबाबत मार्गदर्शन केले. पुणे मनपाचे स्थायी समिती अध्यक्ष बाबूराव चांदेरे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते. श्री संताजी प्रतिष्ठानचे अध्यक्ष रत्नाकर दळवी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी संस्थेचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. यावेळी कोथरूड विभागातील नगरसेवक अॅड. योगेश मोकाटे, नगरसेविका अश्विनी जाधव, पुष्पा कनोजिया, ओबीसी महासंघाचे बाळासाहेब अंबिके, पुणे तिळवण तेली समाजाचे विश्वस्त सतीश उबाळे, माऊली व्हावळ, संजय भगत, श्री संताजी सेनेचे महाराष्ट्र उपाध्यक्ष रामदास धोत्रे, पुणे जिल्हा उपाध्यक्ष प्रीतम केदारी, महिला आघाडी अध्यक्षा दीपा व्यवहारे,सुभाष पन्हाळे, संताजी फऊंडेशनचे प्रकाश पवार, योगतज्ञ नंदकुमार अंबिके़ अप्पर इंदिरानगर, हडपसर येथील श्री संताजी सेनेचे पदाधिकारी आणि समाजातील विविध मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. संस्थेचे सचिव दिलीप शिंदे यांनी प्रास्ताविक केले. उपाध्यक्ष अनिल घाटकर आणि संघटक रमेश भोज यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले, तर संस्थचे अध्यक्ष रत्नाकर दळवी यांनी आभार मानले.
shri santaji pratishtan, gunvant vidyarthi gun gaurav 2013, teli samaj pune