खेड येथे झालेल्या तिळवण तेली समाजाच्या तिळगूळ समारंभात श्री संताजी सेनेच्या तालुकाध्यक्षांची नियुक्ती करण्यात आली. यामध्ये श्री संताजी सेनेच्या महिला तालुका अध्यक्षा म्हणून खेडच्या सरपंच सुवर्णा कहाणे यांची नियुक्ती करण्यात आली. पुणे जिल्हाध्यक्षा दीपा व्यवहारे यांनी त्यांना नियुक्तीचे पत्र दिले. तसेच जिल्हा कार्यकारिणीवर मार्गदर्शक म्हणून सत्यवानशेठ कहाणे यांची, तर रुपेश कहाणे यांचीही खेडच्या तालुकाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. त्यांना पुणे जिल्हाध्यक्ष रमेश भोज यांनी नियुक्तपत्र दिले. रमेश भोज यांनी संताजी सेनेच्या कार्याची माहिती दिली. तसेच खेड ग्रामपंचायतीवर बिनविरोध निवड झाल्याबद्दल सुवर्णा कहाणे यांचा श्री संताजी सेनेच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी संताजी सेनेचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष प्रीतम केदारी तसेच मोठ्या संख्येने समाजबांधव आणि महिला उपस्थित होत्या. सरपंच सुवर्णा कहाणे यांनी तिळगूळ समारंभानिमित्त उपस्थित सर्वांना विविध रोपे वाटप करून ‘झाडे जगवा, पर्यावरण वाचवा’ असा संदेश दिला. तसेच पुणे जिल्हा प्रसिद्धीप्रमुख दिलीप शिंदे यांनी संताजी सेनेने राबविलेल्या विविध योजनांची माहिती दिली. पुणे जिल्हाध्यक्षा दीपा व्यवहारे यांनी महिलांना यावेळी मार्गदर्शन केले. प्रास्ताविक व सूत्रसंचालन कर्पे यांनी केले. सत्यवानशेठ कहाणे यांनी आभार मानले.
shri santaji sena khed, shree santaji sena khed, teli samaj pune