सिंधुदुर्ग जिल्हा तेली समाज उन्नती मंडळाच्यावतीने तेली समाजातील महिला बचतजटांना त्यांच्या व्यवसायासाठी समाजामार्फत ५० हजार पर्यंत बिनव्याजी कर्ज योजना जाहिर करण्यात आली आहे. या योजनेची लवकरात लवकर अंमल बजावणी करण्यात येईल, अशी माहिती सिंधुदुर्ग जिल्हा तेली समाज मडंळाचे सचिव प्रशांत वाडेकर यांनी दिली.
सिंधुदुर्ग जिल्हा तेली समाजाच्या नुतन कार्यकारणीची पहिली बैठक नुकतीच कणकवली येथील नंदू आरोलर यांच्या मधुबन लॉज सभागृहात झाली. यावेळी समाजाचे अध्यक्ष एकनाथ तेली, माजी अध्यक्ष आबा तेली, सचिव प्रशांत वाडेकर, उपाध्यक्ष नंदकुमार आरोलकर, सल्लागार दशरथ कवठकर, खजिनदार संजय कवठकर, गणपत मालंडकर, शरद कांदळकर आदी पदाधिकारी व सर्व तालुकाध्यक्ष व सचीव आदी उपस्थित होते. यावेळी झालेल्या सभेत समाजच्या पढिल उपक्रमांबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी सचीव श्री. वाडेकर यानी जिल्ह्यात आजतागायत तेली समाजातील ज्या बांधवांनी तेल घाणे सुरू ठेवले आहेत त्यांची माहिती संकलित करुन त्यांचा समाज्याच्यावतीने गौरव करण्यात येणार आहे. तसेच त्यांना आधुनिक इलेक्ट्रॉनिक घाणे शासनाने अनुदान तत्वावर देण्यासाठी समाज्याच्यावतीने प्रयत्न केने जातील. तसेच मालवण तालुक्याचे अध्यक्ष सुरेश नेरूरकर यानी ५० हजार व जिल्हाध्यक्ष एकनाथ तेली यांनी ५१ हजार रुपयांची देणगी समाजातील महिलांच्या विकासासाठी जाहीर केली. या देणगीतून तेली समाजातील महिला बचतगटांना ५० हजार रुपयांपर्यंत आर्थिक सहाय्य करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्ह्यातील तेली समाजाच्या महिला बचतगटांनी या योजनेचा फायदा घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
तसेच जिल्ह्यातील तेली समाज बांधवांनी समाजाच्या उन्नतीच्या दॄष्टीने आपल्या संकल्पना किंवा सूचना जिल्हा मंडळाला कळवाव्यात. यासाठी अध्यक्ष एकनाथ तेली ९४२३३०३९०२ व सचीव प्रशांत वाडेकर ९४२२५८४७१२ यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच जिल्हा कार्यकारिणीची पुढील सभा कुडाळ तालुव़यात २१ एप्रिल २०१३ रोजी घेण्याचे निश्चित करण्यात आले आहे.
teli samaj sindhudurge