श्री संताजी सेनेने नुकताच मालेगाव येथे भव्य राज्यस्तरीय कार्यकर्ता मेळावा आणि रिक्षावाटप कार्यक्रम आयोजित केला होता. या मेळाव्यात महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यांमधून संताजी सेनेचे हजारो कार्यकर्ते व जिल्हाध्यक्ष उपस्थित होते. यावेळी संताजी सेनेचे संस्थापक अध्यक्ष श्री. सचिनदादा भागवत, प्रदेशाध्यक्ष प्रा. किशोर चौधरी, प्रदेश उपाध्यक्ष श्री. रामदास धोत्रे यांनी पदाधिकार्यांना व कार्यकर्त्याना समाजकार्याबाबत तसेच भविष्यातील विविध योजनांबाबत मार्गदर्शन केले. यावेळी समाजातील १० समाजबांधवांना रिक्षांचे वितरण करण्यात आले. सर्व जिल्ह्यांतील अध्यक्षांनी आपले मनोदय यावेळी व्यक्त केले. तसेच महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षांनीही समाजातील दुर्बल महिलांसाठी योजनांमधील ५०% निधी मिळावा, अशी मागणी केली. त्यावर मा. सचिनदादा भागवत म्हणाले, ‘पन्नास टक्क्यांचा विषय राजकारणात चालतो, मी महिलांसाठीही १०० टक्के योजना राबविणार’. संताजी सेनेत असा भेदभाव कधीही होणार नाही. यावेळी महाराष्ट्रातील सर्व जिल्हाध्यक्षांच्या कार्यविस्ताराचा आढावा घेण्यात आला. त्यात पुणे जिल्ह्यातील कार्य अहवालातील प्रगती पाहून मा. सचिनदादा भागवत यांनी जिल्हाध्यक्ष श्री.रमेश भोज यांना प्रथम क्रमांकाचा ५१ हजार रुपयांचा पुरस्कार जाहीर केला. श्री. भोज यांचे महाराष्ट्रातून कौतुक होत आहे.
यावेळी पुणे येथिल ‘तेलि गल्ली मासिक’ व चाळीसगांव येथील साप्ताहिक ‘जनमत विचार’ यांचे प्रकाशन मा. सचिनदादा भागवत यांच्या हस्ते करण्यात येवून संपादक श्री. मोहन देशमाने यांची संताजी सेना महाराष्ट्र प्रचार प्रमुख म्हणुन नियुक्त करण्यात आले. सोबत औरंगाबाद जिल्हा महिला अध्यक्ष सौ. दामिनी महाले, सातारा जिल्हा सौ. सुरेखा हाडके मॅडम, नाशिक शहराध्यक्ष रमेश भागवत, नांदगांव तालुकाध्यक्ष बी. आर. चौधरी यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या.
कार्यक्रमाचे यशस्वी नियोजनाबद्दल मालेगांव शहराध्यक्ष आबासाहेब चौधरी यांचे सत्कार सचिनदादा यांनी केला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी निवृत्ती बागुल, रमेश चौधरी, शरद चौधरी, किरण चौधरी, जगदिश चौधरी यांनी केले.
कार्यक्रमाचे सुत्र संचालन एन. के. चौधरी व आभार प्रदर्शन त्र्यंबकनाना चौधरी यांनी केले. यावेळी संताजी सेनेचे शेकडो कार्यकर्ते व संपुर्ण महाराष्ट्रातुन आलेले पदाधिकारी उपस्थित होते.