‘शिक्षण’ या तीन अक्षरी शब्दामध्ये माणसाचं आयुष्य बदलून टाकण्याचे सामर्थ्य आहे. परदेशात देखील शिक्षणाला सर्वाधिक महत्व दिले आहे. त्यामुळे तेली समाजाने देखील शिक्षणाला सर्वाधिक महत्व दिले आहे, असे प्रतिपादन सिंधुदुर्ग जिल्हा तेली समाज उन्नती मंडळाचे अध्यक्ष एकनाथ तेली यांनी केले.
देवगड तालुका तेली समाज उन्नती मंडळाच्यावतीने तळेबाजार येथिल सिध्दिविनायक सभागृहात आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. तेली समाजातील गरीब व गरजू विद्यार्थ्यांना मुंबई मनपाच्या नगरसेविका सौ. संजना किशोर मुणगेकर यांच्यामार्फत व महाराष्ट्र तेली समाज कोकण संघटक सुधीर त्रिंबककर यांच्यामाध्यमातून शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले.
नामदेव तेली, तालुकाध्यक्ष सदानंद तेली. जिल्हा सरचिटणीस प्रशांत वाडेकर, भाजप कुडाळ महिला तालुकाध्यक्षा सौ. लक्ष्मी आरोंदेकर, देवगड तालुका वधु-वर सूचक मंडळाचे अध्यक्ष दिगंबर वरेरकर, सल्लागार अशोक तेली, भरत तेली, सौ. भारती तेली, सचिव तुकाराम तेली, मधुकर कुवळेकर, सौ. शुभांगी तेली, मोहन तेली, सूर्यकांत तेली, हरदास तेली, दिनेश तेली, रवींद्र हिंदळेकर आदी उपस्थित होते.
यावेळी समाजाच्यावतीने तालुक्यातील इ. ४ थी ते पदवीधर विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला. दाभोळे येथील हेमंत गजानन तेली याने दहावी परीक्षेत ९४ टक्के गुण मिळविल्याबद्दल त्याचा सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हाध्यक्ष श्री. तेली यांनी त्याच्या संपूर्ण शैक्षणिक खर्चाची जबाबदारी स्वीकारली.
मुंबई येथील नगरसेविका सौ. संजना मुणगेकर यांनी गरीब व गरजू विद्यार्थ्यांसाठी दिलेल्या वह्यांचे वाटपही करण्यात आले. तालुकाध्यक्ष श्री. तेली म्हणाले, समाजाच्यावतीने गतीब व गरजू विद्यार्थ्यांना नेहमीच मदत करण्यात येते. त्याचा लाभ घेऊन विद्यार्थ्यांनी शेक्षणिक प्रगती साधावी. यावेळी श्री. हिंदळेकर म्हणाले की, तेली समाजाने तालुक्यात मोठ्या मेहनतीने संघटना उभी केली आहे. समाजबांधवांनी बळ देऊन संघटनेचे काम जोमाने वाढवावे, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी सौ. आरोंदेकर, भरत तेली, प्रशांत वाडेकर यांनी आपले विचार मांडले. सूत्रसंचालन श्री. तेली यांनी केले.