नेपाळ येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय लंगडी स्पर्धेत भारतीय महिला संघाचे प्रतिनिधीत्व सिंधुदुर्ग जिल्हातील मालवण तालुक्यातील कु. मोहिनी राघोबा मिठबावकर हिच्या संघाने मात करीत यशाची मोहर उमटविली. कु. मोहिनी मिठबावकर ही सिंधुदुर्ग जिल्हा तेली समाज उन्नती मंडळाचे कार्यकारीणी सदस्य श्री. राघोबा धोंडीराम उर्फ दादा मिठबावकर यांची कन्या आहे. सिंधुदुर्ग जिल्हा तेली समजाच्यावतीने कु. मोहिनीचे जिल्हाध्यक्ष श्री. एकनाथ तेली व सचीव श्री. प्रशांत वाडेकर यांनी अभिनंदन केले आहे.
नेपळ येथिल पोखरा या ठिकाणी भारत व नेपाळ यांच्यानध्ये आशियाई लंगडी फेडरेशन व नेपाळ लंगडी असोसिएशन यांनी आयोजित केलेल्या या स्पर्धेत भारतीय महिला संघाने २१ विरूद्ध २० असा एका डावाने विजय मिळविला. या संघात तेली समाजाची कोकणकन्या कु. मोहिनी मिठबावकर भारतीय संघाचे प्रतिनिधीत्व केले. ती सिंधुदुर्ग जिल्हातील मालवण कट्ट येथील वराडकर हायस्कूल येथे शिक्षन घेत आहे. जानेवारी २०१४ मध्ये भुतानमध्ये, एप्रिल ते जुन दरम्यान बांगलादेश आणि श्रीलंका येथे होणार्या आंतरराष्ट्रीय संघातही कु. मोहिनी मिठबावकर ही भारताचे प्रतिनिधीत्व करणार आहे. तीच्या या यशाबद्दल तेलीसमाज.इन च्यावतीनेही हार्दीक अभिनंदन.