[/slideritem]
[slideritem title=”तेली समाज स्नेहमेळावात बोलतांना माजी पोलीस अधीक्षक आप्पा तेली. बाजूला एकनाथ तेली, जनार्दन तेली, सदानंद तेली, सुरेश नेरुरकर आदि.”]
[/slideritem]
[slideritem title=”उपस्थित समाज बांधव”]
[/slideritem]
[slideritem title=”संताजी जगनाडे महाराज यांच्या जीवनावर आधारीत कीर्तन सादर करताना ह.भ.प. हरिहर श्रीपाद नातू(मालवण)”]
[/slideritem]
[/contentslider]
भारतात तेली समाज मोठा असून समाज उन्नतीसाठी एकोपा राखणे काळाची गरज आहे. असे मत गोवा राज्याचे माजी पोलीस अधीक्षक आप्पा तेली यांनी येथे व्यक्त केले.
देवगड तालुका तेली समाज उन्नती मंडळ व शिरगाव तेली समाज यांच्या संयुक्त विद्दमाने संताजी जगनाडे महाराज पुण्यतिथी व ज्ञाती बांधवांचा स्नेहमेळावा नुकताच शिरगाव-आंबेखोल येथील लोके मंगल कार्यालय येथे पार पडला. व्यासपिठावर जि.प. माजी उपाध्यक्ष जनार्दन तेली, सिंधुदुर्ग तेली समाजाचे अध्यक्ष एकनाथ तेली, जिल्हा सचिव प्रशांत वाडेकर, समाजाचे मालवण तालुकाध्यक्ष सुरेश नेरुरकर, देवगड तालुकाध्यक्ष सदानंद तेली, सचिव तुकाराम तेली, शिरगाव तेली समाज समिती अध्यक्ष पंढरीनाथ कुवळेकर, उपाध्यक्ष नरहरी तेली, पुंडलिक शेटये, दिगंबर वरेरकर, सुभाष शेट्ये, परशुराम झगडे, आप्पा तळवडेकर, शैलेश डिचोलकर, चंद्रकांत तेली, पुजा तेली, शुभांगी तेली, सौ. लक्ष्मी आरोंदकर, प्रवीण शेट्ये आदी उपस्थित होते.
तळेबाजार येथे नियोजित समाज भवनासाठी जिल्हाध्यक्ष श्री. तेली यांनी ५१ हजार व मालवण तालुकाध्यक्ष श्री. नेरूरकर यांनी २० हजाराची देणगी दिली. समाज भवनासाठी अशोक तेली यांनी पाच गुंठे जागा दिली आहे. सूत्रसंचालन व आभार राजेंद्र शेट्ये यांनी मानले. दरम्यान मेळाव्याच्या समारोपप्रसंगी संताजी जगनाडे महाराज यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम पार पडला.