अहमदनगर येथील जिल्हा तेली समाज महासभा आयोजित श्री संताजी सेवा मंडळ ट्रस्ट, अहमदनगर यांचे सौजन्याने राज्यस्तरीय वधुवर परिचय व सामुदायीक विवाह सोहळा तसेच सोबत घटस्फोटीत विधवा व विदूर परिचय मेळावा येत्या 19 फेब्रुवारी 2014 रोजी सकाळी 9 ते 4 वाजेपर्यंत आयोजीत केलेला आहे. कार्यक्रमाचे स्थळ -राष्ट्रीय शिक्षण मंडळ पाठशाळा, सहकार सभागृहासमोर, स्टेशनरोड, अहमदनगर आहे. फाॅर्म ज्यांना मिळालेला नसेल त्यांनी को-या कागदावर वधूवरांची माहिती पाठवली तरी चालेल. फाॅर्म पाठविण्यासची मुदत दि.10 फेब्रुवारी 2014 पर्यंत राहील. फाॅर्म फी सोबत रुपये 500/- रोख किंवा मनिआॅर्डर किंवा डी.डी.ने श्री संताजी सेवा मंडळ ट्रस्ट, अहमदनगर या नावाने पाठवावेत, कृपया चेक पाठवू नयेत.
सामुहिक विवाह सोहळयात वधु-वर नोंदणीचे काम चालु असून जिल्हयामध्ये विवाह नोंदणीचे फाॅर्म देण्यात आलेले आहेत. फाॅर्म पूर्णपणे भरुन आपल्या तालुक्यातील समाज अध्यक्ष, जिल्हाध्यक्ष किंवा सामुहिक विवाह समिती, अहमदनगर यांचेकडे पोष्टाने किंवा कुरिअर सेवेने पाठवता येतील.
घटस्फोटीत विधवा व विदूर यांचे परिचय मेळाव्याचे दाखविण्यासाठी येणा-यांची संख्या पाहून स्वतंत्र व्यवस्था करण्यात येणार आहे.
त्याचप्रमाणे या विवाह सोहळयात अहमदनगर तेली समाजाचे जिल्हाध्यक्ष श्री.हरिभाउ डोळसे यांचे चिरंजीव श्रीपाद व चि.सौ.कां.वर्षा यांचा शुभविवाह याच सामुहिक विवाह सोहळयात लावण्यात येणार आहे. तरी या विवाह सोहळयाचे हेच निमंत्रण समजून उपस्थित रहावे हि विनंती अध्यक्ष श्री.हरिभाउ डोळसे यांनी केलेली आहे.