संताजी प्रतिष्ठान, कोथरुडच्या वतीने मंगळवार, दि. २० मे रोजी मोफत राज्यस्तरीय तेली समाज वधू-वर पालक परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. मेळावा सूष्टी गार्डन, म्हात्रे पूल, एरंडवणे, पुणे येथे होणार आहे. अशी माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष रत्नाकर दळवी यांनी दिली.
दळवी म्हणाले, कोणतीही फी न घेता या मेळाव्याचे आयोजन केले आहे. तरी वधू-वर पुस्तिकेसाठी तेली समाजबांधवानी मुला-मुलींचे पासपोर्ट आकाराच्या फोटोसह अर्ज १० मे पर्यंत [email protected] या ईमेलवर पाठवावेत. माहितीसाठी संस्थेचे अध्यक्ष रत्नाकर दळवी (९९२२५१३७२७), संघटक रमेश भोज (९६०४७६७०६८) यांच्याशी संपर्क साधावा. या संधीचा समाजातील विवाहेच्छूकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.
वधू-वरांची नाव नोंदणी फॉर्म डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेला फॉर्म भरुन सबमिट करावा.
[Closed]