गेली दोन वर्षे पुणे शहर व जिल्ह्यात समाजासाठी विविध उपक्रम करणार्या संताजी सेनेचे महाराष्ट्र प्रांतिक तेली समाज महासभेत विलीनीकरण करण्यात आले. संताजी सेनेचे पुणे जिल्हा अध्यक्ष रमेश भोज यांनी आपल्या सर्व सहकार्यांसह महाराष्ट्र प्रांतिक तेली समाज महासभेत प्रवेश केला व इथून पुढे महासभेच्या तत्त्वप्रणालीनुसार व मार्गदर्शनाखाली समाज कामे चालू ठेवण्याची ग्वाही दिली. रविवार दिनांक 29-09-2014 रोजी भवानी टेक्निकल इन्स्टिट्यूट, बिबवेवाडी येथे संताजी व महासभेचे पदाधिकारी यांची संयुक्त बैठक होऊन वरील निर्णय घेण्यात आला. महासभेच्या वतीने खालीलप्रमाणे पदांच्या नियुक्तिपत्रांचे वाटप करण्यात आले –
श्रौ रमेश भोज – कार्याध्यक्ष, पुणे जिल्हा
श्री दिलीप शिंदे – सचिव, पुणे जिल्हा
श्री प्रितम केदारी – युवा अध्यक्ष, पुणे जिल्हा
श्री संतोष व्हावळ – युवा अध्यक्ष, पुणे शहर
श्री सूर्यकांत बारमुख – प्रसिध्दि प्रमुख, पुणे जिल्हा
श्री गणेश चव्हाण – अध्यक्ष, दौंड तालुका
सौ.राधिका मखामले – अध्यक्षा – महिला आघाडी, पुणे जिल्हा
सौ.निशा करपे – उपाध्यक्षा – महिला आघाडी, पुणे जिल्हा
सौ. निलम घाटकर – अध्यक्षा – महिला आघाडी, पुणे जिल्हा
याप्रसंगी विजय रत्नपारखी, दिलीप चौधरी, चंद्रकांत पन्हाळे, सुभाष पन्हाळे, बाळासाहेब अंबिके. चंद्रकांत व्हावळ माऊली व्हावळ, दिलीप चिलेकर, प्रदीप सायकर, रमेश डाफे, अनिल उबाळे, हेमंत खोंड, दत्तात्रय पवार, सचिन नगिने, पोपट गंधाले, दिगंबर डवरी, मीरा व्हावळ, सुनिता भोज, आरती व्हावळ, छाया बारामुख, भाग्यश्री व्हावळ, राणी खोंड, सुलोचना लोखंडे, कमल सुपेकर, ललीता मांजरेकर, कल्पना उनवणे, सीमा पवार हे उपस्थित होते. विजय रत्नपारखी, चंद्रकांत व्हावळ, सचिन नगिने, दिगंबर डवरी, प्रदीप सायकर, दिलीप चिलेकर यानी मार्गदर्शन केले. आपापसातील हेवेदावे व अहम विसरूनएकमेकांच्यासहकार्यानेसमाजाच्याहिताचीकामेकरण्याचानिर्णयघेण्यात आला. विजय रत्नपारखी यांनी सुदुंबले येथील संताजी महाराजांच्या समाधीस्थळाचा विकास करणे अत्यंत आवश्यक असल्याचे सांगितले. राधिक मखामले यांनी त्याच्या कार्यालयात कायमस्वरूपी वर-वधू नोंदणी करण्याचे सुचविले. प्रास्तविक व सुत्रसंचालन रमेश भोज यांनी केल तर दिलीप शिंदे यांनी आभार मानले. महालक्ष्मी देवीच्या आरतीने कार्यक्रमाची सांगता झाली.