श्री संताजी महाराज जगनाडे यांच्या पुण्यातिथीनिमित्त श्री संताजी महाराज जगनाडे तेली संस्थेने सुदुंबरे (ता. मावळ) येथे आयोजति केलेल्या कार्यक्रमात शनिवारी (ता. २०) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे बंधू व गुजरात तेली समाजाचे अध्यक्ष सोमाभाई मोदी आणि गुजरात येथील सामाजिक कार्यकर्ते राजमोहन मोदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. शनिवारी दुपारी ११ ते १२ या वेळेत निंबराज महाराज जाधव यांचे कीर्तन होणार आहे. दुपारी १२ वाजता सोमाभाई मोदी व राजमोहन मोदी यांचे मार्गदर्शन होणार आहे. या वेळी राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, माजी सार्वजनिक बांधकाममंत्री जयदत्त क्षीरसागर, खासदार श्रीरंग बारणे, शिवाजीराव आढाळराव पाटील, वंदना चव्हाण, आमदार महेश लांडगे, लक्ष्मण जगताप, बाळा भेगडे आदी उपस्थित राहणार आहेत असे श्री संताजीमहाराज जगनाडे तेली संस्थेचे अध्यक्ष जनार्दन जगनाडे यांनी कळवले आहे.