समाजात वावरताना समाजाशी एकरुप होऊन संघटीतपणे काम केल्यास खर्या अर्थाने तेली समाजाची उन्नती होण्यास मदत होईल. आपल्या यशामध्ये नेहमी आपल्या समाजाची साथ असते. यशासाठी पहिले प्रोत्साहन हे समाजाकडूनच मिळत असते, याचा अनुभव आपण अनेकदा घेतला आहे, असे प्रतिपादन मुंबई मनपचे भांडूप येथील नगरसेवक रुपेश वायंणकर यांनी केले.
सिंधुदुर्ग तेली समाज उन्नती मंडळाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त कणकवली वृंदावन हॉल येथे आयोजित वधुवर पालक परिचय मेळाव्यात ते बोलत होते.
तेली समाजातील गरीब व आर्थिक दृष्ट्या दुर्बल असलेल्या कुटुंबातील विवाहांसाठी समाजाच्यावतीने सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी नावनोंदणी करावी, असे आवाहन सचीव श्री. वाडेकर यांनी केले आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा सचिव प्रशांत वाडेकर यांनी केले. सूत्रसंचालन शाम निवेलकर (सावंतवाडी), सौ. स्वाती हिंदळेकर (देवगड), कु. दर्शना काळसेकर (कणकवली), सौ. तृप्ती तळवडेकर (कणकवली) यांनी केले. तर आभार परशुराम झजडे यांनी मानले.