दि. १७-१२-२१ रोजी रथयात्रा उस्मानाबाद महानगर स्वागत कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
सदर रथयात्रा कार्यक्रमास आमदार श्री. कैलासदादा पाटील यांनी भाषणात संत संताजी महाराज जगनाडे जीवनचरित्र आधारित शालेय शिक्षण पाठ्यपुस्तकात धडा असावा असे मनोगत व्यक्त केले होते.त्याप्रमाणे मुख्यमंत्री -उपमुख्यमंत्री -शिक्षणमंत्री यांना आ. कैलास पाटील यांनी निवेदन पत्र देण्याची कार्यवाही केली आहे.
सोबतचे प्रमाणे शालेय शिक्षण मंत्री श्रीमती वर्षाताई गायकवाड यांना आ. कैलास पाटील यांनी निवेदन पत्र प्रदान केले आहे.
याप्रमाणे युवा आघाडी अध्यक्ष तथा आमदार श्री . संदीप भैय्या क्षिरसागर हे सुद्धा निवेदन पत्र देणार आहेत.
यासाठी श्री.सुभाष पन्हाळे अध्यक्ष सेवा आघाडी -श्री.सुनील चौधरी समन्वयक -श्री.नरेंद्र चौधरी महासचिव युवा आघाडी यान्नी दोन्ही आमदार महोदयांना विनंती केली होती. त्यासाठी संत संताजी महाराज जगनाडे ओवीरुपी चरित्र लेखक डॉ. मधुकर सदाशिव वाघमारे (राज्य उपाध्यक्ष सेवा आघाडी ) यांचा मुद्देसूद लेख माहितीस्तव उपलब्ध करून दिला आहे.