चाळीसगाव येथील मूळ रहिवासी मात्र गुढे येथे नोकरी निमित्त ३५ वर्षे अखंड एकाच शाळेत माध्यमिक शिक्षक म्हणून ज्ञान दानाचे कार्य करणारे समाजप्रिय, विद्यार्थी प्रिय आदर्श शिक्षक कै. आप्पासाहेब उत्तमराव खंडू चौधरी यांचा शिक्षकी व सामाजिक कार्यावर प्रकाश टाकण्याचा एक छोटासा प्रयत्न कै. आप्पासाहेबांचा जन्म चाळीसगाव येथील एका श्रीमंत सधन सामाजिक सेवाभावी, दानशूर कुटुंबात झाला.त्यांनी शिक्षकी पेशा पत्करून ज्ञानदानाचे कार्य हाती घेतले.गुढे ता.भडगाव या खेड्यात सर्वोदय माध्यमिक शाळेत शिक्षक म्हणून काम करत असताना ते परिवारासह खेडे गावातच स्थायिक झाले. शिक्षणाची खरी गंगोत्री खेडयातूनच वाहिली पाहिजे या उदात्त विचारसरणी अंगी असलेले आप्पांनी हजारो विद्यार्थी घडविले. ज्ञानाबरोबर गावाच्या समाजकार्यात आप्पांचा मोठा सहभाग असायचा ज्ञानदान व समाज कार्यामुळे त्यांची गावात एक उत्तम आदर्श शिक्षक म्हणून ख्याती होती. गुढे येथे त्यांनी तेली समाज मंडळाची स्थापना मंडळाच्या माध्यमातून केली. त्यांनी सामाजिक, शैक्षणिक धार्मिक कार्यात काम करत मंडळाचा विस्तार करत मंडळाला पुढे आणले व आज हे मंडळ गावात एक अग्रेसर आहे. विद्यार्थीप्रिय, समाजप्रिय शिक्षक असलेले आप्पा एक आदर्श शेतकरी सुद्धा होते. आप्पांनी गावातील मंदिर जीर्णोद्धार, दुरुस्ती, रंगरंगोटी, कीर्तन सप्ताह, अन्नदान, धार्मिक सण, उत्सव, क्रीडा स्पर्धा आयोजनात हिरीरीने सहभाग घेऊन स्वतः बक्षिसे वर्गणी देऊन आर्थिक स्वरूपात भरीव मदत असायची यासाठी कुठलाही स्वार्थ, हेतू नसायचा ही सारी कृती एक आदर्श विचारसरणीचा समाजप्रिय शिक्षक असलेला माणूसच करू शकतो.