Atal Pension Scheme : ज्येष्ठ नागरिकांच्या कल्याणासाठी सरकारने अटल पेन्शन योजना सुरू केलेली आहे.
या सरकारी योजनेत दररोज केवळ सात रुपयांची गुंतवणूक करून वृद्घापकाळात नागरिक पाच हजार रुपयांची मासिक पेन्शन मिळवू शकतात.
या योजनेत गुंतवणूक करून तुम्ही निवृत्तीनंतर तुमचं जीवन आर्थिकदृष्ट्या सुरक्षित करू शकता. या योजनेत गुंतवणूक केल्यास तुम्हाला वृद्धापकाळात कोणत्याही आर्थिक समस्यांना सामोरं जावं लागणार नाही.
वयाची 18 ते 40 वर्षे पूर्ण केलेल्या व्यक्ती या योजनेसाठी अर्ज करू शकतात. समजा तुम्ही वयाच्या 18व्या वर्षीच या योजनेसाठी अर्ज केला तर तुम्हाला दररोज फक्त सात रुपयांची बचत करावी लागेल.
म्हणजे दरमहा तुम्हाला Atal Pension Scheme योजनेत 210 रुपये गुंतवावे लागतील. जेव्हा तुम्ही 60 वर्षांचे व्हाल त्यानंतर तुम्हाला दरमहा पाच हजार रुपये पेन्शन मिळेल.
विशेष म्हणजे या योजनेत टॅक्स सूटदेखील उपलब्ध आहे. इन्कम टॅक्स ऍक्ट 80C नुसार, अटल पेन्शन योजनेच्या लाभार्थ्यांना 1.5 लाख रुपयांपर्यंतचा टॅक्स बेनिफिट मिळतो.
तुमच्या जवळच्या बँकेत जाऊन Atal Pension योजनेसाठी अगदी सहज अकाउंट उघडू शकता. अकाउंट उघडण्याची प्रक्रिया अगदी सोपी आहे.
यामध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या अडचणींचा सामना करावा लागणार नाही. या योजनेसाठी अर्ज सादर करणार असाल तर तुमचं बँक अकाउंट आणि आधार क्रमांक एकमेकांशी लिंक असणं गरजेचं आहे.
आवश्यक कागदपत्रे – आधार कार्ड, मोबाईल नंबर, ओळखपत्र, कायमच्या पत्त्याचा पुरावा, पासपोर्ट आकाराचा फोटो इत्यादी कागदपत्रांची गरज भासेल.
टीप – अर्ज केल्यानंतर सहा महिने तुम्ही अटल पेन्शन योजनेत गुंतवणूक केली नाही तर तुमचं अकाउंट फ्रीझ केलं जाईल.