श्री. सुभाष पुंडलीक चौधरी
प्रशिक्षण अधिकारी
प्रगत व्यवसाय प्रशिक्षण पध्दती (आय.टी.आय.)
औंध, पुणे – ४११००७
जन्म : दि. २५ ऑक्टोबर १९५४.
शिक्षण : शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण, मार्च १९७२.
आय.टी.आय. मशिनीस्ट ट्रेड, पास १९७२-७४.
ए.टी.टी.सी.व्दारा शासकीय तंत्र निकेतन, मिलराईट मेकॅनिक ट्रेड पास १९७४-७६.
ए.टी.आय. कोलकत्ता इन्स्ट्रक्टर ट्रेंनिग, पास १९८२.
ए.टी.आय. चेन्नई व कोलकत्ता देशांतर्गत ट्रेनिंग, १९८४-८५ व १९८९-९०.
फेलोशीप ट्रेनिंग स्वीडन (स्टॉकहोम) २ महिने १९९०.
श्री. सुभाष पुंडलीक चौधरी यांचे शेतकरी/शेतमजूर कुटुंबात कासारे तालुका साक्री, जिल्हा धुळे येथे झाला असून प्रतिकुल परिस्थितीस तोंड देऊन शिक्षण पूर्ण करून, कौटुंबिक जबाबदारी चांगली पार पाडत असतांनाच शिकवण्यची उपजत आवड असल्याने व्यवसाय शिक्षण/प्रशिक्षण क्षेत्रात राज्य निवड मंडळामार्फत थेट निवड.
प्रशिक्षणार्थी/सहकार्यांमध्ये अतिशय प्रिय आहेत. औरंगाबाद, अंबरनाथ, पुणे येथे दैनंदिन प्रशिक्षण प्रभावीपणे दिले. त्यामुळे दरवर्षी दिलेल्या वार्षिक उद्दिष्टांपेक्षा जास्त उद्दिष्ट गाठण्यात यश आहे. संस्थेच्या परिसरातील औद्योगिक आस्थापनांना अधिकार्यांसोबत भेटी देऊन संस्था व कारखाने यांच्यामधील संबंध दृढ केले. नवीन तंत्रज्ञान आत्मसात करुन त्याचा वापर प्रशिक्षणार्थ्यांसाठी केला.
प्रशिक्षणाचे काम करीत असताना संस्थेची शिस्त, स्वच्छता,टापटीप इत्यादी बाबींकडे विशेष प्रशिक्षण कार्यक्रमास समन्वयक म्हणून नेहमीच जबाबदारी स्वीकारली. उत्पादनान्भिमुख प्रशिक्षण योजनेंतर्गत विशेष प्रशिक्षण कार्यक्रम(रोटरी क्लब, पुणे, एअरपोर्ट एरिया, पुणे) पार पाडले.
त्यांच्या या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन शासनाने त्यांना सन २००१-२००२ या वर्षीचा “उत्कृष्ट शिक्षक” राज्य पुरस्कार प्रदान केलेला आहे.