समाजाच्या वतीने भोसरी येथील कै. अंकुशराव लांडगे नाटयगृहात गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभात सकाळ माध्यम समुहाच्या ‘पुणे बस डे’ उपक्रमाला पिंपरी-चिंचवड शहरातील तेली समाजबांधवांनी जाहीर पाठिंबा दिला आहे. सकाळ माध्यम समुहाचे कार्यकारी संपादक (राजकीय) गोविंद घोळवे यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत समाजाच्या सर्व पदाधिकारी आणि ज्ञाती बांधवानी उत्स्फूर्तपणे हात उंचावत एक नोव्हेंबरला आम्ही बसनेच प्रवास करणार अशी ग्वाही दिली.