जय संताजी युवा मंच तिळवण तेली समाज यांच्या संयुक्त विद्यमानाने विद्यार्थी पालककरिअर मार्गदर्शन शिबीराचे आयोजन दि-५/५/२०१३ रोजी श्रीराम मंदीर किराडपुरा येथे कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाचे प्रस्ताविक श्री. सोमनाथ सुरडकर यांनी केले. या कार्यक्रमाचे उद्घाटक श्री. फकिरचंद थोरात तर कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. कल्याणबरकसे कार्यक्रमाचे वक्ते श्री.संजय मगर हे होते. प्रमुख उपस्थीती श्री. उत्तमरावमनसुटे, श्री. कचरु वेळजंकर, श्री. अॅड दिपक राऊत, श्री. विजय गवळी. श्री. संजय मगर पुढे बोलताना म्हणाले नोकरी करण्यासाठी जर करिअर निवडायचे असेल तर स्पर्धापरिक्षा एक उत्तम पर्याय असुन जर दहावी बारावी पासुन स्पर्धा परिक्षेचा अभ्यासकेल्यास यश हमखास मिळते. तसेच श्री. मगर यांनी स्पर्धा परिक्षेतील विद्याथ्र्याच्या मनातील गैरसमज दुरकेले. या वेळी विद्यार्थी पालक मोठया संख्येने उपस्थीत होते. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री. रामेश्वर क्षिरसागर यांनी केले तर आभार श्री. चांगदेव हिंगे यांनी मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वीते साठी श्री. सुनिल क्षिरसागर संतोष पवार, दत्ताभोलाने, एकनाथ हिरे, रवि लोखंडे , श्याम क्षिरसागर, संतोष शिंदे, शुंभम राऊत, नितीन तावडे, बळीराम देशमाने आदीने परिश्रम घेतले.